नवल झाले लई..
नवल झाले लई..
दहा वर्षांचा बाप झाला
अन् तेरा वर्षांची आई,
घडायचं राहिले नाही काही
अन् नवलच झाले लई...
असा हा हायब्रीडचा जमाना आला
तज्ज्ञ डॉक्टरही परेशान झाला,
जनावरं बरी माणसांपेक्षा
माज आलाय माणसालाच लई..
कुणाला नाही कशाचे भान
रोजच घडतंय नवीनच कांड,
नाती गोती उरली नाहीत
पाहीना कोणी बहिण, आई..
जगात सारं घडू नये ते घडतंय
लग्नाआधीच बाळ रडतंय,
विधवेचेही पोट वाढतंय
देवळात देव इथे नाही...
काय सांगावं कुणाचं पाप
लेकीच्या संगेच झोपतंय बाप,
जगाचं भरलंय पापाचे माप
सांगा ही दुनिया बुडणार की नाही...
