नवी पिढी....
नवी पिढी....
नवी पिढी
हुशार आणि आश्वासक,
तुमच्यावर भविष्य
असते तारणहार...
नवी पिढी
नवनिर्माणाचे स्वागत,
विविध सेवासुविधांची
असते नेहमी पंगत. ..
नवी पिढी
देते जुन्याला दाद,
नसताे त्यांच्याकडे
नाहक जुना वाद...
नवी पिढी
चैतन्यानी भारलेली,
डाेळ्यात आश्वासने
नेहमीच आसुसलेली...
