नशीबावर विश्वास
नशीबावर विश्वास


ठेवून कपाळावर हात
नशीबावर विश्वास का करावा ?
कर्म करुन ध्येय गाठूनी
स्वत:चा समतोल राखावा..!!
पंगू देखील जगी सरसरुन
शिखरावर चढतात
प्राण्यांना समजत नसे नशीब
तरी मालकाचे कार्य नीट करतात.!!
नशीबाला दोष ही कधी देवू नये
कष्टांती लागतात महामेरुवर सुमने
कोणतेच कार्य कठीण नसते
ते प्रज्वलित आपणच करणे..!!
एक छोटसं बी-बियाणे
मातीतून अंकुरत असतेय
एक मुंगी जमीन फोडून
वारुळ बनऊन जगतेय.!!
हे नशीब काय आहे
आळशीपणाचा बहाणा
जो थांबला जगी तो
आपलाच करतोय खकाणा.!!
दैवगतीच्या प्रहाराने घाबरूनी
भविष्य नाही कधी सुधारणार
बसल्या ठिकाणी इच्छा आकांक्षा
नाही दुसरं कुणी ही पुरवणार.!!