नशीब
नशीब
ईश्वराने मला नशीब दिलं मोठं किती
आई तुझ्या पोटी जन्म घेतला मी
हे विपुल विश्व मला तूच दाखविले
जीवन जगण्याचे कसब मला शिकविले
मुलगा आणि मुलगी असा केला नाही भेद
आई अशी नाही सर्वांची हा मोठा खेद
मुलगा जन्मावा म्हणून मायबाप करी देवाचा धावा
का हवा असतो गं त्यांना फक्त वंशाचा दिवा
पणतीमध्येही सामर्थ्य असते घराला प्रकाश देण्याचे
तिच्यातही बळ असते स्वतःला सिद्ध करण्याचे
मग मुलगा आणि मुलगी यांत फरक कोणता मोठा
मुलगा जन्मन्यात गं विशेष कोणता ताठा
स्रीला द्यावा लागतोय तिच्या अस्तित्वासाठी लढा
स्रीभ्रुणहत्याऱ्यांच्या पापाचा भरलाय गं आता घडा
आजही कित्येक ठिकाणी
नारीला गुदमरून जगावं लागतंय
आपल्या कित्येक स्वप्नांना
मनातच मारावं लागतंय
एवढं दुर्दैवी नशीब देव का गं कुणाचं लिहितो
देव का गं स्त्रीची अग्निपरीक्षा घेऊ पाहतो
प्रत्येक आई एक स्त्रीच तर असते
मग स्रीभ्रुणहत्येस ती तयार कशी होते
खरंच गं आई मी नशीबवान मोठी
जन्म लाभला मला तुजसारिख्या देवतेच्या पोटी...!
