नरजन्माचा दागिना
नरजन्माचा दागिना
नर जन्माला येऊन
धर्म मानवाचा जाणा
सारे जाणून वागतो
तोच माणूस शहाणा
ईश्वराच्या कार्यासाठी
पाय झिजावे केवळ
गूण देवाचे गाऊन
व्हावे वाणीने निर्मळ
सांगे मानवाचा धर्म
दान हाताचे भूषण
सदा करावे कानांनी
सत्य विचार श्रवण
रूप सौंदर्य सृष्टीचे
दृष्टीमध्ये साठवावे
कृतज्ञता भावनांनी
प्रेम त्याचे आठवावे
हृदयाच्या कोंदणात
वसो निर्मळ भावना
माणसाचा सर्वोत्तम
हाच असावा दागिना
