STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy

4  

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy

नकोशा स्मृती विस्मृतीतल्या

नकोशा स्मृती विस्मृतीतल्या

1 min
414

आठवणीत राहाव्या घर करून

त्या स्मृती कधी आठवत नाही!

विसराव्यात कायमच्या स्मृतींना

विसरताच का बरं येत नाही?१


सुखद,स्मृती जपून ठेवाव्यात

वाटती अलवार मन: पटलावर!

दु:खद स्मृतीच दिसत राहतात 

पापण्या बंद असल्यावर!!२


निर्भया प्रकरण विसरू म्हणता  

प्रियंका रेड्डीचं आक्रंदन घडलं!

स्त्रि्यांवरील अत्याचारांच्या यादीत

आणखी एक हिंस्र पाऊल पडलं!!३


मिट्ट काळोख पसरला जेथे लपली

जंगली श्वापदं लचके तोडण्यास!

वाचणेच अशक्य कोमल कळ्या

धोंड्यांना त्या पाझर फोडण्यास!!४ 


अमानवीय कृत्य स्मृतीत राहिल

नको त्या संदर्भांसह तपशीलवार!

अत्याचारी लटकवून तरी स्रीयांचा

बलात्कार,हत्या कशा थांबविणार!!५


अस्वस्थ झाले आज लिंगपिसाट

अत्याचा-यांच्या घृणास्पद कृतीने!

का ठेवणार तरीआठवणी साठवून

वेदनांच्याच खपल्या कटू स्मृतीने!!६



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy