नको ते प्रलोभन
नको ते प्रलोभन
1 min
276
हवे शिक्षण, संघटन
प्रगती, परिवर्तन,
त्या धर्मांतरासाठी
नको कोणते प्रलोभन.
शाहू, फुले, आंबेडकर
व्हावा यांचा अंगीकार,
जिद्द, चिकाटी, परिश्रमाने
व्हावे जिवनाचं या सोनं.
हवे शुध्द आचरण
जाना समाज श्रण,
जपावा स्वाभिमान
न्याय, हक्काची जाण .
शिक्षण, संघर्ष, संघटन
बाबासाहेबांची शिकवण,
कर्मकांड ते सोडून
हे बदलूया जीवन...
धर्म मानवता, बंधुता
नांदो एकता,समता,
शिखर यशाचं गाठावं
विषमतेचे करा खंडन..