Varsha Shidore

Romance


3.2  

Varsha Shidore

Romance


नखरा गजरा नि मुखडा साजरा...

नखरा गजरा नि मुखडा साजरा...

1 min 1.8K 1 min 1.8K

सख्या नातं तुझं नि माझं अखंड स्वप्न 

जणू मोगऱ्याचा असावा सुगंधी गजरा... 

केसात ओवते मी हौशीने नि तू म्हणतो 

खुलून दिसतो तुझा मुखडा साजरा... 


आता तू नाहीस ना रे सख्या सोबत माझ्या

तरी सतत देत असताे तो मला आठवण... 

खंड पडू देत नाही मी आपल्या नात्याला 

मी पुन्हा नव्याने करत राहते साठवण... 


तुला माझ्या येण्याची चाहूल द्यायला 

गजरा नि माझ्या पैंजणांचा आवाज... 

तू आतुर असायचा घ्यायला आस्वाद 

हरखून जायचास पाहून माझा साज... 


तू तासनतास काढायचास देखणे चित्र 

मी ओवलेल्या गजऱ्यातल्या देखाव्याचे... 

त्यासाठी घरभर मिरवत फिरवायचा सुगंध 

मग मलाही असायचे कुतूहल पाहण्याचे... 


तुझ्या आठवणींचा आठवणीने माळते 

मी दररोज मोगऱ्याचा भरगच्च गजरा... 

या आशेवर की तू एकदा परत येशील 

नि कुजबुजशील किती सुंदर तुझा नखरा... 


Rate this content
Log in

More marathi poem from Varsha Shidore

Similar marathi poem from Romance