STORYMIRROR

vanita shinde

Tragedy

3  

vanita shinde

Tragedy

नियतीची खेळी

नियतीची खेळी

1 min
438

नियतीने अशी खेळी केली

परिस्थितीसंगे माणसंही बदलली,

कुटनितीला बळी पडली

स्वार्थासाठी माणुसकी सोडली.


सावकारांची ती सावकारी वाढली

गरीब जनता कुजत पडली,

नको त्या अमिषाला बळी गेली

ख-याची दुनिया मातीत दडली.


लाचलुचपत उरी बाळगली

भ्रष्टाचाराशी मैत्री जोडली,

परोपकाराची भाषा सोडली

माया ममतेची नाती तोडली.


वासनेने माणसंही वेढली

सगळ्यांची मने निष्ठूर झाली,

नियतीने अशी खेळी केली

परिस्थितीसंगे माणसंही बदलली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy