नियती
नियती
नाही सुरक्षित कोणी, तरी भासवा आभास.
सहन करणाऱ्या नशिबी, सारा काय तो त्रास.
विकृती ती वाढत आहे, भिती उरली नाही कोनाला.
पळवाटा एवढ्या झाल्या, धाक बसला कायद्याला.
सामान्य मनुष्य झीझत, पुन्हा पुन्हा बळी पडून.
समाज व्यवस्तेची आशा आहे, फक्त शाशना कडून.
न्याय मिळावा साऱ्यांना, मनाच्या समाधाना साठी.
कोन कसा वागेल, तयार आहेत सारी नाती.
कुठं जातोय आम्ही, ही कसली प्रगती.
काळाच्या ओघात, आता वेळच ठरवेल नियती.
