नियती
नियती
नियती कोण? मित्र की शत्रू?
किनारा, वाळू, स्पर्श, समाधान, मुकेपण, अबोलेपण, निःशब्द गप्पा
मला काय हवं होतं हे नियतीला पक्कं माहित होतं.
पण तरीही...
मी स्वतःसाठी जे काही निवडलं होतं, नियतीनेही माझ्यासाठी तेच का नाही निवडलं?
नियतीच जर मोठी असेल तर मग जन्म का दिलाय?
जन्म आमचा आणि जगणं मात्र नियतीच्या मर्जीचं !
नियतीला खुश ठेवण्यासाठी झालाय का जन्म?
येणारा काळ पाहत रहायचा... मुकाट्यानं.
कदाचित उद्या तरी आपल्याला हवं तेच घडेल अशी स्वतःची समजूत काढायची.
कदाचित माणूस 'कदाचित' या शब्दामुळेच स्वप्न पाहतो.
आयुष्याला 'उद्या'ही आहे असे मानून जगणं सहन करतो.
