तू तुला अन मी मला
तू तुला अन मी मला
1 min
27.5K
सोडूनी तू तुला अन मी मला
एकदा तरी भेटूया जरा
शब्द नकोच ते विपर्यासाचे
नजरेनेच खरं बोलूया जरा
सांग ना काय करशील?
खूप आठवण आली तुझी सांगशील?
विसरून सारं एक मिठी मागशील?
कि परवानगी न मागताच कुशीत शिरशील?
सुखाचा हिशोब अजूनही बाकी आहे,
बेरीज धुरकट अन स्पष्ट वजाबाकी आहे
जग कसं शोधेल आपल्या प्रश्नाचा गुंता?
दूर नाही मन माझं, तुझ्या एका हाकी आहे.
चल... सोडूनी तू तुला अन मी मला
एकदा तरी भेटूया जरा
