STORYMIRROR

Dr RaajShree Tamhane

Inspirational

4  

Dr RaajShree Tamhane

Inspirational

अस्तित्व..

अस्तित्व..

1 min
688


कधीकधी असं का होतं? सगळं थांबल्यासारखं का वाटतं?

म्हणजे सगळं चालू असतं,

पण तरीही सगळं थांबल्यासारखं वाटतं. का?

मागे वळून पाहिलं तर कुणीच अडवून नाही ठेवलंय. 


किंबहुना सगळे आपापल्या वाटेने कधीच निघून गेलेत आणि 

समोर पाहिले तर पुढची वाट मोकाट मोकळी पसरलीय.

पण तरीही क्षण असा स्तब्ध का व्हावा?

सगळं तात्पुरतं मी, तू, ती, तो आणि सगळेच.


मन इथे नाही पण मन तिथेही नाही.

पाऊस कोसळतो पण भिजणं होत नाही.

गुंतणं कळत नाही, घडतंय ते समजत नाही.

स्पर्श आणि निष्कर्ष... स्वतःचं अस्तित्व नाकारतात कधीकधी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational