जरा
जरा
जरा...
वाट पाहायला लावणारा शब्द.
थोडक्यात खूप काही मागणारा शब्द.
कधी मागणाऱ्याला तर कधी ऐकणाऱ्याला लाचार करणारा शब्द.
जरा.
शब्द छोटा आभाळाएवढा.
फक्त सुरु होणारा पण
कधीच न संपणारा शब्द.
अनिश्चित......
अनंत... अंत माहित नसलेला...अंत शोधणारा....अश्वथामासारखा बिचारा.
जरा...
वेळेवर मात करणारा शब्द.
भावनांच्या परिघेवर येउन ओठांशी येणारा शब्द.
कधीकधीच भेटणारा शब्द.
जरा....
नेहमी तहानलेला...भुकेलेला...
केवढा??? तहानलेल्याच्या तहानेएवढा.
