निसर्ग
निसर्ग
कुणी म्हणे निसर्ग कोपला
कुणी म्हणे सूर्य तापला ।
खरे तर माणूस स्वतःलाच हसला.।
कुणी म्हणे निसर्ग बदलला.
कुणी म्हणे सूर्य आग ओकला.
खरे तर माणूस स्वतःच लबाड वागला.।
जगा-अन्-जगू दया निसर्ग होता."बोलला"
जग-हे.-जगण्यासी ऊर्जा देतो सूर्य बोलला
खरे तर माणूस इतरांशी मारून स्वतः जगला.
कुणी नाही वेगळा साऱ्याचांच 'मी' निसर्ग होता "बोलला"
सर्व सजीवांसाठी 'ऊर्जा' स्रोतास्तव सूर्य तापला.
खरे तर माणूस स्वतःच्या-कुकर्माशी हसला.
कुणाची 'मी'नाही मालकी ध्यानीअसू दया निसर्ग होता "बोलला"
कुणी धराया सूर्याशी 'मस्करी'शी तो तापला .
खरे तर माणूस स्वतःच्या-मर्यादा 'न'ध्यानी ठेवून जगला.
माझ्यापेक्षा श्रेष्ठ "ना'कुणी निसर्ग होता "बोलला"
मर्यादा ओळखून"जग" यासाठी सूर्य आग ओकला.
खरे तर माणसाशी कळले', आज सूक्ष्म जीव जगला.।
सूक्ष्म जीवाने फक्त तूच का? ग्रासला म्हणे निसर्ग कोपला.
सूर्यासह सर्व गात्र का आनंदी या 'शी' सूर्य तापला.
सूक्ष्म जीवाने साऱ्या सृष्टीचा जगण्याचा खेळ का?थांबला.
कुणी म्हणे निसर्ग कोपला। कुणी म्हणे सूर्य तापला
खरे तर माणूस स्वतःलाच हसला.
