निसर्ग
निसर्ग
निसर्ग नटला अवघा
हिरवा शालू धरणी ल्याली
वनराई ही सुखावलेली
शृंगाराचे रस पान प्याली
नदी,झरे तुडुंब भरले
खळखळ आवाज घुमला
काननी पशू-पक्षी गाती
मंजूळस्वर कानी आला
झाडे-झुडपे फुलपाखरे
अवचित रानी बागडती
धबधब्याच्या गीतासह
अवघे सूर ते आवडती
स्रुष्टीचे ते रूप मनोहर
परमात्म्याचे रूप दिसे
कणकणातील सौंदर्य
नयनी प्रत्येकाच्या वसे
निसर्गाचा अनमोल
ठेवा करू या जतन
निसर्गाच्या सहाय्याने
उजळून निघे अपुले प्राक्तन
