निसर्ग माझा गुरु
निसर्ग माझा गुरु
निसर्ग माझा गुरू
कास एकच धरू
त्याच्याकडून शिकून
परोपकार करू ||
निसर्गाकडून शिकू
एकोप्याची भावना
एक जीवाने राहुनी
आणू मंत्र जीवना ||
निसर्गाबद्दल ठेवूया
अफाट दिव्य दृष्टी
रक्षण करूनी त्याचे
जतन करूया सृष्टी ||
सृष्टीचा असे नियम
ठेवा सर्वांनी ध्यानी
नका उचलू कु-हाड
मित्र असे ठेवा मनी ||
निसर्गातील वस्तू
खूप काही शिकवती
त्यांच्या या संगतीत
राहुनी जोडा नाती ||