STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

निसर्ग किमया

निसर्ग किमया

1 min
303

निसर्ग करी , अदभुत किमया

मानवास न कळे , तयाची छाया (१)


 चक्रीवादळाने , उसळे सागर

शहरे बुडती , हानीचा कहर (२)


सोसाट्याचा वारा , वर्षा अवकाळी

पिके कापणीला , वाहूनीच गेली (२)


कधी संकट , येई अवर्षणाचे

थके , कृषीवल , पाणी लोचनाते (३)


विषाणू रोगाचा , पसरे जनांत

हतबल मनू , अडके घरात (४)


जीवघेणा रोग , भयाण कोरोना

उधळे संसार , कुणा आवरेना (५)


यंत्रविज्ञानाने , प्रगती लाभली

गर्व मानवा , त्रिभुवने जिंकली (६)


निसर्ग दावी , अस्त्र ठेवणीतले

श्रेष्ठत्व कसे , किमयेने दावले (७)


निसर्ग किमया , मनू उमजला

श्रेष्ठत्व जाणी , शरणागती आला (८)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract