निसर्ग काव्य
निसर्ग काव्य
पाऊस धारा
गार हा वारा
मोर पिसारा
हिरवी काया
देऊन छाया
सारी किमया
फुले फुलली
वृक्ष बहरती
शालू पांघरती
धरती नटली
शृंगार ल्याली
दवाने न्हाली
आनंदले पक्षी
निळ्या आकाशी
ढगांची नक्षी
शालू हिरवा
नेसूनी मिरवा
पाचूने मढवा
फळ, फुलांचा
शृंगार तयांचा
हिरव्या पानांचा

