निश्चय
निश्चय
खळखळून मनी हसायचे
सर्वांना मनोमन खूप हसवायचे
न कोमेजता फुलांसारखे फुलायचे
सर्वांना फुलांसारखे फुलवायचे
स्वतः मनसोक्त रमायचे
इतरांनाही खूप रमवायचे
आपण खूप काही शिकायचे
वेळप्रसंगी मार्गदर्शनही करायचे
स्वतः मनमुराद जगायचे
इतरांनाही मनमुराद जगवायचे
आनंदात राहून दिवस काढायचे
कायम प्रत्येकाला आनंद वाटायचे
मनोमनी आनंद लुटायचे
पैशाला भुलती सारे जगाचे
निश्चय एकच करू जोडण्याचे
कोणी न जीवन जगो एकटेपणाचे
निश्चयाचा महामेरू ठरवायचे
एकात्मतेचे सार सर्वांनी पाळायचे
माणुसकीने साऱ्यांचे मन जिंकायचे
निश्चयाने लढून संकटावर मात करायचे
