STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Action Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Action Inspirational

निरमयी

निरमयी

1 min
153

जेव्हा

एक मुल जन्मला येते

तेव्हा

एक स्त्री आई म्हणून जन्म घेते

निरामयता...


गर्भात जाणली ती माऊली एक तुच होती

जन्मास मुला घालता जन्मात: आई होती

मायेच पांघरुणाची संवेदना ती एक होती

काळजीचा स्वर तो चिंता नजरेत होती


काळाचा आभास तो पापणीत सल होती

जन्मास कळी कोवळी पौर्णिमा उदयात होती

गर्भात जाणली ती माऊली एक तुच होती

जन्मास मुला घालता जन्मात: आई होती

भावनेस कळ लागता जखम ती सालस होती

एका मागुन एक ती सावली उन्हात करपत होती

जीवास आस जन्मास आशावाद घालीत होती

कधी काळाची माय माऊली स्वत्व जपत होती

भान येता जरासा का वाट आंधळी होत होती

जगण्यास तिच्या अश्या ते कारणे मागत होती

गर्भात जाणली ती माऊली एक तुच होती

जन्मास मुला घालता जन्मात: आई होती


निर्भर निळ्याशार नभाखाली एकली उभी होती

मोकळ्या आकाशी स्वैर अनुवाद मांडत होती

कोंडल्या मनाची काया एक दया मागत होती

उदयात उदयाच्या ती मोकळ नभ मागत होती

कोमल्कांती अवनी ती धुमसता अंगार होती

जन्मास मुल येता अवनी ची ती धरा माय होती

गर्भात जाणली ती माऊली एक तुच होती

जन्मास मुला घालता जन्मात: आई होती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy