STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

3  

Shital Yadav

Inspirational

निराकार रुप

निराकार रुप

1 min
28.3K


निराकार रुप ।तुझे पांडुरंगा

श्रीहरी,श्रीरंगा।चराचरी।।


तव भेटीसाठी।व्याकुळले मन

द्यावे तू दर्शन ।पामरास।।


धाव रे अनंता ।वाजतो मृदंग

होऊनिया दंग।कीर्तनात।।


सावळा श्रीहरी।चंद्रभागेतिरी

उभा विटेवरी ।ध्यानमग्न ।।


संथ जलधारा ।अखंड वाहती

वारकरी न्हाती। भक्तिभावे।।


विठु माझा देव।अनंताचा स्वामी

दास त्याचे आम्ही।सदाचारी ।।


तुझ्याच कृपेने ।उजळे जीवन

लाभे संजीवन ।निशिदिनी ।।


मागते मी दान ।तुझिया कृपेचे

अखंड सेवेचे ।मनोभावे।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational