STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract Classics Others

3  

Sharad Kawathekar

Abstract Classics Others

निनावी वादळ

निनावी वादळ

1 min
201

वेगवेगळ्या नावांनी सजलेलं तरीसुद्धा ते

वादळ निनावीच 

वर्तमानाच्या मुखपृष्ठावरचं उमेद भरणारं

कधी वसंताची पालवी घेऊन येणार तर

कधी आभाळाला सोबत घेऊन येणार 

त्या वादळाला

ना घर ना दार

ना सुरूवात ना शेवट 

कधी टेकडीवरच्या पाऊल वाटेनं येणार 

तर कधी समुद्राच्या लाटाबरोबर येऊन 

परसदारातल्या चाफ्याजवळ विसावणारं

स्वाभिमान वेशीवर टांगून येणारं

एखाद्या स्वार्थी हतबल माणसासारख

रागंत रागंत जगणारं

जगत जगत माणसांच्या काळजात शिरणारं

संवेदना जिवंत ठेवायला लावणार एक 

माणसाळलेलं वादळ 

येणाऱ्या बेहिशोबी अश्रूचे 

हिशोब मागणारं वादळ 

मौनातच मौनाशीच संवाद साधणार

एक निनावी वादळ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract