नेताजी सुभाषचंद्र बोस
नेताजी सुभाषचंद्र बोस
चमकता चंद्र तूच
रणरणता सूर्य तू
ब्रिटिशांचा काळ तूच
स्वातंत्र्याची ही आस तू ||१||
देशभक्ती वाहे अंगी
पाश गुलामगिरीचे
भोगला हा बंदीवास
पाही स्वप्न स्वातंत्र्याचे ||२||
बुद्धिवान या जगाचे
अपार ही देशभक्ती
शिखरे सर करुनी
दाखवली ही महती ||३||
भरे हृदय दुःखाने
असे स्वातंत्र्याचा ध्यास
तिरंगा कसा फडके
पाहण्या येई सुभाष ||४||