STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

नेहमीच नसत रे घडत मनासारखं ...

नेहमीच नसत रे घडत मनासारखं ...

1 min
2.5K


हुंदका आवरत ती म्हणाली होती येते रे मी ...

मी उभा होतो तसाच कितीतरी वेळ निःशब्द 

पहातच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ....

ती नजरेआड होईपर्यंत... दूर -दूर जाताना ...

 अखेर भावनांचा बांध फुटलाच ... शेवटी न राहवून ...

त्या एकांतात रडून घेतल धाय मोकलून ,हमसून - हमसून   

उर फुटेस्तोवर दुःख मनात दाटले होते तेव्हा ... 

मन रीत झालं डोळ्यातील पाऊस गालावरन ओघळून 

क्षणभर काहीच सुचेनासं झालं होतं एवढं सगळं घडल्यावर 

इच्छाच उरली नव्हती जगण्याची ... तुझे एकेक शब्द ...

काळीज चिरत गेले होते मी हताश , स्तब्ध ,दगडागत 

सावरायला हवं तुला , काळजी घे स्वतःची तूच समजावलं होतं  

इतके दिवस झाले तरी पण मला आजपर्यंत उमगलं नाही ते कोडं...

नेमकं तुला काय हवं होतं ,माझ्याविषयीचा दृष्टिकोन कोणता ?

प्रेमही होतं जीवापाड तर मग ... असं काय घडलं ? तू गेलीस अचानक 

फारसं काही ना बोलता .फक्त म्हणालीस नेहमीच नसत रे घडत मनासारखं ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance