नदीस पत्र
नदीस पत्र
काय लिहू नदी माय
पोटा पाण्याची तू साय।
अनंत उपकार माय
तुझे आम्हावर हाय।।धृ।।
केली सुपीक जमीन
भागविली तु तहान ।
नंदनवन या देशाची
तू खरी आमुची माय।।१।।
जल जीवन भरले
मोती शिंपले ठरले।
वाळू उपसा कितीही
थरावर थर हाय।।२।।
झरे झरने झरले
नदी सागर भरले।
संस्कार संस्कृती मोठी
नदी काठावर माय ।।३।।
पाऊस आनंदे भरी
हिवाळा सुखाच्या सरी
उन्हाळा सोडते पान्हा
तीन ऋतुची तू माय।।४।।
पुर्णा माय विदर्भाची
गंगा माय या देशाची
भारामाही छत्र छाया
यमुना जमुना माय ।।५।।
