नदी
नदी
कन्या गिरी राजाची, निर्झर असे भ्राता
अवखळ खळखळ करुनी, निघाली कुठे सरिता?
त्यागुनी बंध नात्यांचे, वाहते कशी वेगात
वळणावर वळणे घेऊनी, चालली बघा डौलात
जाताच दूरवर थोडी, होतसे थोडीशी संथ
मोहवी मनास सर्वांच्या, रूप तीचे ते शांत
तिच्या क्रमित मार्गात, करीते समृद्ध जीवना
होते मार्गस्थ समोर, ठेऊनी रम्य पाऊलखुणा
अशुद्ध, अपवित्र सारे, सामावून स्वतःतच घेते
तिच्या पवित्र दानाने, जुळविते मनाशी नाते.
झिजणे तिचे सर्वांस्तव, परी नाही अपेक्षा काही
प्रियकर सागर मिलनाची, बस ओढ नदीला बाई
