STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Tragedy

4  

.प्रमोद घाटोळ

Tragedy

नभांगणा

नभांगणा

1 min
330

आसुसले नयनी स्वप्न 

गोड तुझ्या गं आगमनाचे

मनात खूणगाठ होती

हृदयात भाव मैतरीचे


होता मला भरोसा

तुझ्या आबाद यौवनावरत

नाचणार होतो खुशीने

तू हळूवार स्पर्शल्यावर


पण तू अवेळी घात केला

का खेळलिस खेळी

मारले तीर हृदयावर

मला बनविले भिकारी


उभ्या तरुण हिरवळीचा

तू नाश केला

अन्नाचा विझवला निखारा

तोंडचा घास नेला


घनाचे प्रहार केले

होरपळत्या उन्हाहूनी भारी

पिके मरून गेली

उरला न कोणी कैवारी


तू नदी होऊन बरसली

स्वप्न तार तार झाले

शेतं सजली पेटत्या सरणांनी

पिकं तरणेच मेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy