नातं भाऊ - बहिणीचं
नातं भाऊ - बहिणीचं
प्रेम असतं ह्रदयातून,
बंधन असतं अनोखी प्रेमाचं,
नातं फुलत असतं पवित्र क्षणांतून,
तेच असतं नातं भाऊ - बहिणीचं.
कधी हसू तर कधी रूसवा,
जिथं बंधन नसतं कोणत्या गोष्टींचं,
करमत नाही थोडाजरी असला दुरावा,
अतुलनीय असं नातं भाऊ - बहिणीचं.
बहिण बांधते प्रेमाचं प्रतीक राखी,
भाऊ पार पाडतो कर्तव्य रक्षणाचं,
बहिणही बनतो संकटकाळी भावाची सखी,
जिव्हाळ्याचं असं नातं भाऊ - बहिणीचं.
त्यांचं प्रेम जणू निर्मळ झराच सतत पाझर,
नात्यामध्ये दडपण नसतं कशाचं,
खरंच, त्यांच्या नात्याला नाही कशाची सर,
तेच असतं पवित्र नातं भाऊ - बहिणीचं."
