STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

3  

Varsha Chopdar

Inspirational

नाते

नाते

1 min
672


नाते

असावे प्रेमळ

जशी उबदार शाल

सदैव राहो मायेची ढाल



नाते

असावे घट्ट

त्याची अतूट वीण

कृतज्ञतेची ठेवू या जाण



नाते

असावे विश्वासावर

संकटे आली कितीही

नाते न तुटावे कधीही



नाते

दाखवी भवसागर

सांगत असे कानमंत्र

आचरण करूया हे तंत्र



नाते

दाखवी नानारूपे

याची गोष्टच आगळी

त्यांचीच गरज पडते वेळोवेळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational