STORYMIRROR

kishor zote

Romance

3  

kishor zote

Romance

नाते युगायुगांतरीचे

नाते युगायुगांतरीचे

1 min
385


तुझे नी माझे नाते

असे युगायुगांतरीचे

अलगद जपलेले

पाण्यातील स्वप्नांचे


खेळतांना खेळ नियती

दार किती ठोठावायचे

तुझे नी माझे श्वास जिथे

ठोके एकत्रच धडकायचे


नाही म्हटले तरी उगाच

किंतु कशाला आणायचे

प्रत्येक श्वासागणिक तर

होकार असतात हुंकाराचे


हात असे हातात तर

भय का उगा अंधाराचे

पाऊलागणिक सोबत

पडछायेने एक होण्याचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance