STORYMIRROR

Ashwini - Mishrikotkar

Inspirational

3  

Ashwini - Mishrikotkar

Inspirational

नारीशक्ती महान

नारीशक्ती महान

1 min
262

जगण्याचा अर्थ शिकविला जिने

तिचा अपमान करू नये कधीही

छातीशी कवटाळून दूध पाजले तिने

तिला दूर लोटू नये कधीही...१


विविध रुपांनी नटलेली ती

आयुष्य भर सोबत करते

विसरू नये तिला मात्र

जी आई बापाला सोडून येते...२


करते संसारासाठी कष्ट

सुख दुःखाचा उचलते भारा

करावा सन्मान नारी शक्तीचा

येऊ नये तिच्या डोळ्यांत धारा...३


मनगटात असते बळ तिच्या

संकटांचा सामना ती करते

दुर्गा , रणरागिणी बनून ती

सर्वांच्या पाठीशी उभी राहते...४


 नारी शक्ती महान आहे जगतात

 आधार सहनशक्ती व कौशल्याचा

करावा आदर स्त्रीच्या सद्गुणांचा

अनमोल ठेवा आहे कर्तव्यांचा....५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational