STORYMIRROR

Kavita Pudale

Inspirational

0  

Kavita Pudale

Inspirational

नारी शक्ती

नारी शक्ती

1 min
699


चला देश उध्दाराचे कार्य हाती घेऊया .

आपण सारे सिध्द होऊया

चला नवा भारत घडूया

झाले गेले सारे विसरून जाऊया

सखीनो चला संघटित होऊया

शिका .. संघटित व्हा संघर्ष करूया

चला नवा भारत घडूया.


अज्ञान सारे आपण मिटवूया

नवयुगाचे कार्य हाती घेऊया

साक्षरतचे कार्य हाती घेऊया

नव्या पिढीला साक्षर करूया 

चला नवा भारत घडवूया.


व्यसनापासून दूर राहूया

प्रबोधनाचे कार्य हाती घेऊया

व्यसनमुक्ती आपण करुया

नारी शक्ती जागृत करूया

चला नवा भारत घडवूया.


चला सखीनो शिकूया

अज्ञान मनातील मिटवूया

मनामनातील अंधःकार घालवूया .

अज्ञान आपण मिटवूया

चला नवा भारत घडवूया


चला सखीनों संघटित होऊया

संघटन शक्तीचे कार्य हाती घेऊया

मतभेद मिटवूया, संघटित होऊया

संघटनशक्ती जागृत करूया

चला नवा भारत घडवूया


चला सखीनों अन्यायावर संघर्ष करूया

सुरक्षितेचे कार्य हाती घेऊया

नारी हिताचा संघर्ष करूया

संघर्ष शक्ती जागृत करूया

चला नवा भारत घडवूया


देश प्रगतीचे कार्य हाती घेऊया

राष्ट्रनिर्मिती कार्य हाती घेऊया

राष्ट्रहिताचे कार्य करूया

प्रगतीसाठी आपण झटूया

चला नवा भारत घडवूया


चला एक नवा भारत घडवूया

डॉ . बाबासाहेबांचा मंत्र सत्यात साकारूया

शिका .. संघटित व्हा संघर्ष करूया

चला सखीनो सिध्द मंत्र मिळवूया

चला नवा भारत घडवूया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational