STORYMIRROR

Vivekanand Benade

Abstract

3  

Vivekanand Benade

Abstract

नाराज मन

नाराज मन

1 min
169

नाराज मन 

का म्हणून का विचारता

थोडे मन झाले माझे नाराज..


सारे आहे जग ज्यांचे

त्यांच्याच ओठी जोंधळा 

ज्यांच्या वर नाही छप्पर

त्यांच्या करवंट्यात नाचतो कावळा


का म्हणून का विचारता 

थोडे मन झाले माझे नाराज


हा नोकरीचा बडगा 

करतो वार सपा सपा

पाच पन्नास देवोनि

करतो आयुष्यचा उतारा


का म्हणून का विचारता

थोडे मन झाले माझे नाराज


साधू संत येऊनि केला

देवांचा हा पसारा

त्यांच्याच नातवानी केला

देवांचाच निपटारा


का म्हणून का विचारता

थोडे मन झाले माझे नाराज


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract