नाद
नाद
या सोशल मीडियाचा नाद
घरात सुरू झालाय नवा वाद
रिमोटवर ज्याची मक्तेदारी
त्यांचीच टिव्हीवर मदार सारी
जो तो फोनवर फिरवतो आपला हात
जेवण ही विसरतो व्हाॅटसअपच्या नादात
यू ट्यूब झालाय जीवनाचा अविभाज्य भाग
व्हिडिओ करतात साऱ्यांच्या मनावर राज्य
इटंरनेटचे वेड जगाला लागलंय सुसाट
आयुष्य जगतात सारे 24×7 च्या थाटात
