STORYMIRROR

Kshitija Pimpale

Tragedy

2  

Kshitija Pimpale

Tragedy

नाद पबजीचा

नाद पबजीचा

1 min
903


दिस उजाडल बाई झोप पुरी झाली नाही

पबजीच्या येडापायी रातीला जागरण होई !!


पाणी तापवते माय , थंडगार ते होते

आंग धुना ना रे बाबू , म्हणूम्हणू कटायते !!


गरमचा गार झाला, नाश्ता कधी करशील

नऊ वाजताची बस, सांग कशी धरशील !!


सोड पबजीचा नाद,जरा माणसात ये रे राज्या

खाणपिणं कधीतरी,वेळच्यावेळी घे रे राज्या !!


जप आरोग्य स्वतःचे, चिंता भविष्याची कर

सारे होईल मंगल, शिक्षणाची कास धर !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy