मूक कहानी
मूक कहानी
किंमत नाही आपल्यांची, पाई ठेवलंय त्यांना.
कोणाचीही हिंमत नाही, आता समजाऊ कोन्हा कोन्हा.
सगळेच बोलतात, जे चालू आहे तेच आणी तेच ठीक.
मग आयुष्यालाही वाटू लागते, एक एक श्वासांची भीक.
मन मारून जगायला, आता आम्ही नव्याने शिकलोय.
या एकाच कारना मुळे का होईना, आजवर आम्ही टिकलोय.
आता खुप झाल मलाही बोलायचय, सगळं काय ते सांगायचय.
उद्धट उलट किंवा तिरस्कार नाही, स्वतःसाठी एक पाऊल चालायचंय.
विरोध माझ्यात झालाय, माझ्याच त्या विचारांशी.
खरं बोलण्यासाठी ती काय गरज, आता कोणाची.
अजूनही धाडस नाही बोलायच, फक्त विचार कागदावर मांडतोय.
माझ्याच आयुष्याची मूक कहानी, मी मलाच काय ती सांगतोय.
