मुंग्या
मुंग्या


एक मुंगी भर भर चालली
साखरेचा दाणा मध्येच सोडून
थोड्या वेळाने सोबतीला
ती सख्या घेऊन आली...
साखरेच्या दाण्याच्या बाजूला
मेलेला झुरळ बाजूला होता
सगळ्या सख्यांनी
त्याच्या बाजूला पिंगा घातला...
हळूहळू त्यांनी त्याला
एका जागेवरून
दुसर्या बाजूला नेले
जशी मेलेल्या झूरळाची
प्रेत यात्राच काढली त्यांनी...