मुलुख मराठी.
मुलुख मराठी.
हवा वाहते पाणी वाहते,
सह्याद्रीच्या कड्याकपारी ,
महाराष्ट्राचे मावळे येथे,
किल्ले बोलती मराठी,
राजे आमुचे शिवछत्रपती.
वृक्षलता पक्षी सारे,
येथे बोलती मराठी,
हा मुलुख मराठी,
सह्याद्रीच्या उंच माथा
आणि कोकणाची खोल दरी,
येथे हापुस वृक्ष,
बोलती मराठी ,
राजे आमुचे शिवछत्रपती.
अरबी समुद्रची, लाट येते,
बोलते मराठी,
भाताची तुरे येथे,
बोलती मराठी,
ही मुंबई आमुची मराठी,
राजे आमुचे शिवछत्रपती.
इंद्रायणीच्या तिरी,
ही ज्ञानेश्वराची आळंदी,
बोलते ज्ञानेश्वरी मराठी.
देहुचा अंभग बोलतो ,
गाथा तुकारामांची,
हा मुलुख सारा मराठी,
राजे आमुचे शिवछत्रपती.
मराठवाड्याची कोरिव लेणी,
अजिंठा वेरुळ, खानदेश,सारा,
मुक्तायीचे नगर बोलते,
पंचवटीचा राम प्रभु येथे,
बोलतो मराठी,
हा मुलुख सारा मराठी,
राजे आमुचे शिवछत्रपती.
विदर्भात खनिज सारे,
उंच सागाची झाडे,
वाघाची डरकाळी मराठी,
ही वनराई बोलते मराठी,
हा मुलुख सारा मराठी
राजे आमुचे शिवछत्रपती.
