मुक्तछंद
मुक्तछंद
मन गुंतून पडावे
आयुष्य बहरूनी जावे
स्वतःची ओळख होण्या
जीवनी मुक्तछंद जपावे
वाचू पुस्तके अगाध
चित्र रेखाटू भविष्याचे
रंग उधळता इंद्रधनुचे
मनोहरी जीवनाचे
एक एक धागा विणूनी
शाल पांघरू मायेची
जपावे असे छंद मनी
जगणे होई सोयीची.
लावती लळा हे छंद
आत्माचे होई मनोमिलन
जग भासे सुंदर
जपता मनी मुक्त छंद.
