STORYMIRROR

Suvarna Thombare

Others

3  

Suvarna Thombare

Others

ओवाळणी

ओवाळणी

1 min
413

भाऊराया ची माझ्या 

आहे न्यारी प्रित

माहेरी गेल्यावर

नाही विसरत रित


उपासमारी होता

शिक्षण केले बंद

मजूरी ला जुंपूनी

बालपण झाले कैद


तुझ्या कष्टामुळे

आज मी घडले

तुझ्या हातावरचे 

फोड नाही मी विसरले.


दुःख तुझं पाहून

हुंदका मनी दाटे

तुझ्या भविष्याची

चिंता मज वाटे


ताटातला घास

माझ्या ताटी घाली

त्या मायेची सर

कुणालाच ना आली.


भाऊबीजेसाठी आज

एक ओवाळणी घाल

वाईट व्यसन सोडून

संसारात लक्ष घाल.


Rate this content
Log in