STORYMIRROR

Suvarna Thombare

Others

3  

Suvarna Thombare

Others

माझी मराठी बोली

माझी मराठी बोली

1 min
182

महाराष्ट्राची शान

आहे तीला मान

एकमेव भाषा 

मराठी ही छान


कौतुकाचे बोल

सरळ अन सहज

अर्थपूर्ण रसाळ

माय मराठीचा साज


भाषेचा गोडवा

अमृताहून गोड

विरामचिन्हांची तीला

आहे सुंदर जोड


संतांनी रचले 

अभंग ते छान

ऐकताना जाई

हरपून देहभान


कवींची ती लेखनी 

शाहिरांची शान

लेखकांची जान

जगात असे महान


लाभले आम्हास

भाग्य हे खास

बोलतो मराठी

जगण्याची ही आस


ज्ञानेश्वरी त आहे

जीवनाचे सार

माझी मराठी बोली

किर्ती तीची अपार



Rate this content
Log in