दीपावली आली
दीपावली आली
1 min
310
चोहीकडे धुक्याची दुलई
निसर्गाने ओढली पहाटे
गुलाबी थंडीची चाहूल देत
दीपावली आली पहा थेट
दारी सडा रांगोळी
तोरणांनी दारे सजली
दिव्यांची आरास अंगणी
रोषणाई ने गावे उजळली
गोडधोड करण्याची
लगबग झाली सुरू
अभ्यंग स्नानासाठी
उठणे लागले करू
नवीन कपडे,फटाके
गरिबांच्या लेकरांना आणूनी
साजरी करू आपण
दीवाळी फराळ वाटूनी
