दिवाळी पाडवा
दिवाळी पाडवा
1 min
487
गुलाबी थंडीत
अभ्यंग स्नान
उठण्याचा सुगंध
कपड्यांची शान.
दिव्यांची आरास
फटाक्यांचा आवाज
विद्युत रोशनाई
फुलबाजाचा साज
पतीला ओवाळते
पत्नी ची काया
सुंदर गिफ्ट देऊन
खुश करतो राया.
अंगणात शोभे
रांगोळी सप्तरंगी
मनामनातून वाहे
नवचैतन्य अंगी.
सर्व सणांचा
राजा त्यास म्हणती
दिवाळी पाडवा सण
आनंदाने साजरा करती.
