STORYMIRROR

Suvarna Thombare

Others

3  

Suvarna Thombare

Others

अल्लड मन

अल्लड मन

1 min
362

वाऱ्याचे पंख लेवूनी

मनपाखरु हे भिरभिरते

कधी आकाशी तर कधी

भूमीवर पहा कसे फिरते.


स्वप्नांच्या दुनियेत वेडे

मन माझे गुंतते

ढोंगी जगातून दूर

सदा ते रमते.


नाती जपूनी मनाची

निखळ प्रेम करते

स्वार्थी दुनियादारी

ना कधी त्यास कळते.


वयाचे भान नसे

अवखळ ते वागते.

प्रीत मनात परी

हळूवार ते जपते


सप्तरंगाचे तरंग 

अंतरंगी उमटते

त्या रंगात न्हाऊनी

अल्लड मन खुलते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन