मोबाईल
मोबाईल
1 min
378
दसर्याला पूजीला
पाटी,वही सोबतच
मोबाईल ॲडरॉईड
शिक्षणासाठीच.
कोविड ने लावले
शाळेला टाळे
शिक्षणाचे विणले
मोबाईल ने जाळे.
गुगल मीट,झूमवर
ऑनलाईन तास सुरू
चाचणी सोडवण्याची
मजा झाली सुरू.
ऑनलाईन पाढे
कविता ,आणि उतारे
शिकू लागले पाठ सारे
मोबाईल च्या आधारे.
मोबाईल झाला पहा
आजचा खास गुरू
नका त्यास तुम्ही
सदा दोषी धरू.
