बालदिन
बालदिन
देवाची ही निर्मिती
निरागस, गोड, सुंदर
गोजिरी फुले कोमल
प्रतिबिंब असे ईश्वर
हसू खेळू नाचू
अंगणी दारी बागडू
चाचा ची ही लाडकी
सर्वांना लागती आवडू
बागेतील कोमल फुले
हसून डोलती आनंदाने
मनास मोहती ही
रंगीत फुलपाखराप्रमाने
देवाचेच प्रतीक असती
बालगोपाळांचे रूप
आवडती मज सारी
नवचैतन्याचे हे स्वरूप.