मुक्त पक्षी
मुक्त पक्षी
तुझे ते हसणे, असून जाणे
घालत होते मनावर माझ्या घाव
आतातरी साजणे हदयात तुझ्या
ठेवशील का ? गं माझे नाव......!
माझी जीवन प्रणाली जगतांना
प्रेमात तुझ्या पडल्यानंतर
उंच घेतली आहे मी धाव
चुकुन पडलो, कधी ना नडलो
ऐकण्याकरिता तुझे ते "प्रणाली" नाव.....!
तुझ्या त्या हृदयामधील
प्रेमरुपी मेघांच्या पावसाची
पाहतो आहे हा "चातक" वाट
त्या वाटेने जाताना भेटतात गं मला
सळसळणारे साप आणि मोठ-मोठे घाट......!
म्हणूनच म्हणतो आहे आज तुला
मुक्त करून टाक मला आता
तुझ्या त्या "मार्शल" प्रेमा मधूनी
या तुझ्या प्रेम पाखराचे गं नाव......!

