मुक्त मी...
मुक्त मी...
मी अस्मिता,मी मुग्धा ...
परिसीमा त्यागाची
उज्जवलतेची नांदी मी,
प्रकाश शलाका व्योमी...
हर्ष मी उन्माद मी,
उत्तुंगतेची भरारी
करुणामयी मूर्ती मी
परी दुर्गा विनाशकारी मी....
आभाळ मी सावली मी ,
नभांगणातील तारका मी
उल्हासाचं कोंदण मी,
सलज्ज नवपरिणिता सखी मी..
रागिणी अनुप्रिया मी
सृष्टीचा हुंकार मी,
नवचैतन्याची झालर मी,
बीजांकुरातील नवसंजीवनी...
विश्वव्यापिनी विश्वातीत ,
आत्म्या तील हुंकार मी,
तिमिराला भेदणारी
तेज:पुंज उषा मी....