गृहिणी
गृहिणी

1 min

148
जलतळी चिखल अन् शैवाल, तयाठायी उमलावे मृणाल
लेऊनी रश्मी सोनेरी लाल, वाही रंगबिरंगी पखवाल,
तत्सम तू ही सरोज,
हास्य ओष्टी हर रोज
मुकुटी शुळांच्या गुलाब डोलावे,
पसरवुनी शोभा दूजा रिझवावे
घेऊनी ऊन सावलीत हेलकावे,
तूच जाणो स्वत्व कसे सावरावे
जीवनरथ असे हा निरंकुश,
त्यावर विधिलिखिताचा अंकुश
घासूनी श्रमाचा परिस,
अस्तित्व केले खुशमिजास
गृहसौख्यास अर्पिली तनू ती,
शुष्क लोचने आक्रंदती
पद-करकमले धडपडती,
वाहून घेशी प्रवाहाप्रती
सखी, चढउताराविना जीवन,
जणू गंध विरहित सुमन
आयुष्याचे हे तंत्र चिरंतन,
त्व स्मरणे दाटे नयनी आसूवन